Home / Uncategorized / चिराग पासवान बिहार विधानसभा लढवणार

चिराग पासवान बिहार विधानसभा लढवणार

नवी दिल्ली- केंद्रिय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. राखीव...

By: Team Navakal
chirag paswan

नवी दिल्ली- केंद्रिय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. राखीव जागेऐवजी ते खुल्या जागेवरुन ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी बिहारमध्ये स्पष्ट केले.
चिराग पासवान यांनी बिहारमधील सरन इथे एक मिरवणूक काढली . यावेळी त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये डोमीसाईल धोरण राबवण्याची मागणी केली. ते म्हणाले की लोक मला विचारतात की मी सरन मधून निवडणूक लढवणार आहे का? मी यावेळी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असून केवळ बिहारच्या लोकांसाठी काम करायचे आहे.राजद नेते तेजस्वी यादव यांनीही या धोरणाला पाठिंबा दिला आहे. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील केवळ चिराग पासवान यांनीच या धोरणाला पाठिंबा दिला आहे. राज्यातील लोकांनाच सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा असाव्यात यासाठी २००६ मध्ये डोमासाईल धोरण आणण्यात आले होते.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या