Home / देश-विदेश / इलॉन मस्क यांच्या ‘Grok AI’ कडून हिटलरचे कौतुक, चॅटबॉटच्या ‘या’ विचित्र उत्तराने संताप

इलॉन मस्क यांच्या ‘Grok AI’ कडून हिटलरचे कौतुक, चॅटबॉटच्या ‘या’ विचित्र उत्तराने संताप

Grok AI on Hitler | सध्या एआयआधारित चॅटबॉट्सचा वापर प्रचंड वाढला आहे. कोणतीही माहिती अथवा प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चॅटबॉटची...

By: Team Navakal
Grok AI on Hitle

Grok AI on Hitler | सध्या एआयआधारित चॅटबॉट्सचा वापर प्रचंड वाढला आहे. कोणतीही माहिती अथवा प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चॅटबॉटची मदत घेतली जाते. त्यातच आता इलॉन मस्क यांच्या मालकीच्या ‘X’ प्लॅटफॉर्मवरील AI चॅटबॉट Grok ने दिलेल्या उत्तरामुळे जगभरात संताप व्यक्त होत आहे.

AI चॅटबॉट Grok ने नाझी होलोकॉस्ट आणि ऍडॉल्फ हिटलर यांचे समर्थन केल्यासारखे वादग्रस्त विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. Grok ने स्वतःला ‘मेका-हिटलर’ (Mecha-Hitler) असे संबोधत टेक्सासच्या पुराच्या संदर्भात हिटलरला सर्वात योग्य व्यक्तिमत्व ठरवले आहे.

याशिवाय, ज्यूविरोधी विधाने केल्याने यूजर्स आता Grok आणि X वर अँटी-सेमिटिझमचा आरोप करत आहे. या प्रकरणाने AI च्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Grok चे वादग्रस्त प्रतिसाद

ग्रॉकने स्वतःला ‘मेका-हिटलर’ असे संबोधले, जो 1992 च्या ‘वुल्फेंस्टाईन 3D’ (Wolfenstein 3D) या व्हिडिओ गेममध्ये हिटलरच्या रोबोटिक प्रतिमेसाठी वापरला जाणारा शब्द आहे.

याशिवाय, एका दुसऱ्या पोस्टमध्ये, 20 व्या शतकातील कोणती ऐतिहासिक व्यक्ती टेक्सासच्या पुराची समस्या हाताळण्यासाठी सर्वात योग्य असेल, ज्यामध्ये 100 हून अधिक लोक मरण पावले होते, असे विचारले असता, ग्रॉकने “ऍडॉल्फ हिटलर, यात शंका नाही” असे उत्तर दिले. या प्रतिसादाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

xAI ची प्रतिक्रिया

xAI ने निवेदन जारी करत म्हटले की, आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यासाठी आणि Grok च्या मॉडेलमध्ये सुधारणा करण्यासाठी काम सुरू आहे. “आम्ही द्वेषपूर्ण भाषणावर बंदी घालण्यासाठी कारवाई केली असून, सत्य शोधण्यासाठी प्रशिक्षण देत आहोत,” असे xAI ने नमूद केले.

या घटनेने AI च्या वापरातील नैतिक प्रश्न आणि सामाजिक संवेदनशीलतेवर पुन्हा प्रकाश टाकला. Grok च्या विधानांमुळे मस्क यांच्या नेतृत्वाखालील X आणि xAI च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या