जपानने रचला इतिहास! इंटरनेटच्या वेगात नवा विश्वविक्रम, आता संपूर्ण Netflix 1 सेकंदात डाउनलोड होणार

Japan Internet Speed

Japan Internet Speed | जपानने आपल्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक नवीन यश मिळवले आहेजपानच्या संशोधकांनी 1.02 पेटॅबिट प्रति सेकंद या अविश्वसनीय वेगाने जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीडचा (Japan Internet Speed) विक्रम प्रस्थापित केला.

हा वेग इतका प्रचंड आहे की, तुम्ही Netflix ची संपूर्ण लायब्ररी किंवा इंग्लिश विकिपीडिया 10,000 वेळा एका सेकंदात डाउनलोड करू शकता. या यशामुळे जपानने तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन मैलाचा दगड गाठला आहे.

भारतापेक्षा 1.6 कोटी पट वेगवान

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार, हा वेग भारताच्या सरासरी 63.55 Mbps इंटरनेट स्पीडपेक्षा 1.6 कोटी पट जास्त आहे. अमेरिकेच्या सरासरी कनेक्शनपेक्षा देखील हा वेग 35 लाख पट अधिक आहे. या तुलनेने जपानच्या इंटरनेट क्रांतीचा अंदाज येतो.

जपानमधील फोटोनिक नेटवर्क लॅबोरेटरी टीमने सुमोटोमो इलेक्ट्रिक आणि युरोपियन पार्टनर्सबरोबर मिळून 19-कोर फायबर ऑप्टिक केबलचा वापर करत हा वेग साधला. ही केबल 1,808 किलोमीटर अंतरावर डेटा पाठवू शकते आणि सध्याच्या 0.125 मिमी जाडीच्या केबल्सवर चालते.

1.86 एक्सॅबिट प्रति सेकंद-किलोमीटरचा डेटा हा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम आहे. 8K व्हिडिओ किंवा मोठ्या डेटा फाइल्स एका सेकंदात डाउनलोड करणे शक्य झाले आहे.

NICT च्या संशोधकांनी ट्रान्समीटर्स, रिसीव्हर्स आणि 86.1 किमी लांब 19 लूपिंग सर्किट्सचा वापर करत सिग्नल्स 1,808 किमी अंतरावर 180 डेटा स्ट्रीम्सने वाहून नेले. हा शोध भविष्यातील डेटा गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इंटरनेटच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरू शकतो.

Share:

More Posts