राज्यातील २० हजार हॉटेल १४ जुलैला बंद ! आहार संघटनेचा इशारा

Sudhakar Shetty AHAR

मुंबई – महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट (hospitality) उद्योगावर राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सोमवार १४ जुलै (on July 14) रोजी राज्यभरातील २०,००० हून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशन ऑफ होटेल्स अँड रेस्टॉरंट्स (AHAR) संघटनेने घेतला आहे.

अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत उद्योगाला सलग व्हॅट (VAT), परवाना शुल्क आणि उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली. परिमाणी हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर आर्थिक संकट ओढावले आहे. मद्यावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) ५% वरून १०% करण्यात आला, परवाना शुल्कात १५% वाढ झाली आणि मद्यावरील उत्पादन शुल्कात थेट ६०% वाढ झाली आहे. यामुळे उद्योग चालवणे कठीण झाले असून, ग्राहकही दूर जात आहेत. आमच्यासमोर उद्योग बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही अशी खंत आहाराचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी व्यक्त केली.

आहार संघटनेने याआधी अनेक वेळा सरकारकडे निवेदने दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण सरकारकडून कोणतीही सकारात्मक दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra state government)हॉस्पिटॅलिटी उद्योगावर लादलेल्या वाढीव करांचा निषेध म्हणून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोकणातील हॉटेल आणि रेस्टॉरंटने हा बंद पुकारला आहे.