जसप्रीत बुमराहने लॉर्ड्सवर रचला इतिहास! कपिल देव यांचा ‘हा’ मोठा विक्रम मोडला

Jasprit Bumrah Record

Jasprit Bumrah Record | भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध (Ind vs Eng Lord’s Test) तिसऱ्या कसोटीत इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने पाच बळी घेण्याची कामगिरी केली.

यासोबतच, कपिल देवचा परदेशी कसोटीत एका डावात सर्वाधिक पाच बळी घेण्याचा विक्रम मोडला. बुमराहने तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 27 षटकांत 74 धावा देत 5 बळी घेण्याची शानदार कामगिरी केली.

बुमराहने परदेशात खेळलेल्या 35 कसोटीत 13 वेळा पाच बळींचा टप्पा गाठला. यासोबतच, त्याने कपिल देव (66 कसोटीत 12 वेळा पाच बळी) आणि अनिल कुंबळे (69 कसोटीत 10 वेळा पाच बळी) यांना मागे टाकले.

अशाप्रकारे, बुमराह परदेशात खेळलेल्या कसोटीत एका डावात सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याची 47 कसोटींत 215 बळींची सरासरी 19.49 असून, सर्व फॉरमॅटमध्ये 450 हून अधिक बळी आहेत.

या कामगिरीने बुमराहने वसीम अक्रमच्या SENA देशांतील 11 पाच बळींच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याच्या अचूक लेन्थ आणि स्विंगने इंग्लंडचे फलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने पहिल्या दिवशी हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड करत खाते उघडले. दुसऱ्या दिवशी त्याने बेन स्टोक्स (44) आणि जो रूट (104) यांना बाद केले. ख्रिस वोक्सला गोल्डन डकवर आणि जोफ्रा आर्चरलाही बाद करत त्याने इंग्लंडचा डाव 397 वर रोखला.