कॅलिफोर्निया- भारताच्या वतीने अंतराळात गेलेले शुभांशू शुक्ला (Shubanshu Shukla) येत्या १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. १४ जुलैला ते अंतराळ स्थानक सोडणार असून दुसऱ्या दिवशी त्यांचे यान कॅलिफोर्नियाच्या (California) समुद्र किनाऱ्यावर उतरणार आहेत. त्यानंतर त्यांना ७ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार शुभांशू शुक्ला यांची ही मोहीम यशस्वी ठरली असून त्यांनी तिथे अतिसुक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी संबंधीत ७ वैज्ञानिक प्रयोग केले आहेत. त्यातील चार पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर मायक्रोएल्गी, मेंदूंच्या हालचाली, डोळ्यांचा वेग तसेच काही मनोवैज्ञानिक प्रयोगही त्यांनी केले आहेत. मायक्रोग्रॅव्हिटीचा शरीरावर व मनावर होणाऱ्या परिणामाचाही त्यांनी अभ्यास केला. शुभांशू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे मनोबलही उंचावलेले आहे. शुभांशू यांच्या बरोबरच त्यांचे तीन सहकारी पेगी व्हिटसन (Peggy Whitson), स्लावोस विजनस्की (Slavoj whiskey) व टिबोर कापूही त्यांच्या बरोबर ड्रॅगल स्पेसक्राफ्टमध्ये बसून पृथ्वीवर येणार आहेत. १५ जुलैला अमेरिकन वेळेनुसार दुपारी तीन वाजता त्यांचे यान पृथ्वीवर येईल. इस्रोने या मोहिमेवर तब्बल साडेपाचशे कोटी रुपये खर्च केले आहेत.