अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातून १,३०० कर्मचाऱ्यांची कपात होणार

State Department Is Firing Over 1,300 Employees Under Trump Administration Plan

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातून (US State Department) तब्बल १,३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या पुनर्रचना योजनेनुसार ही कर्मचारी कपात केली जात आहे. अमेरिकेत देशांतर्गत काम करणाऱ्या १,१०७ नागरी सेवकांना आणि २४६ परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे परराष्ट्र विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

परदेशी सेवेतील या अधिकाऱ्यांना ताबडतोब १२० दिवसांसाठी प्रशासकीय रजेवर पाठवले जाईल, त्यानंतर ते औपचारिकपणे त्यांच्या नोकऱ्या गमावतील. बहुतेक नागरी कर्मचाऱ्यांसाठी कामावरून कमी करण्याचा कालावधी ६० दिवसांचा आहे, असे त्यात म्हटले आहे.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या कर्मचारी कपातीचे स्वागत केले असून प्रशासकीय व्यवस्थेची फेररचना करण्याच्या उद्देशाने ही कपात आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले.