‘शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा वाईट वाटलं होतं’, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलून दाखवली मनातील भावना

Ravindra Chavan on Eknath Shinde

Ravindra Chavan on Eknath Shinde | 2022 मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांना धक्का दिला होता. त्यावेळीच्या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली होती. आता भाजपचे (BJP) नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी एका मुलाखतीत त्या घटनेवर खुलासा केला आहे.

रवींद्र चव्हाण यांनी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने वाईट वाटले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री न झाल्याने सर्वच भाजप कार्यकर्त्यांना दुःख झाले असे मत व्यक्त केले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटले होते की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, पण शिंदे यांच्या शपथग्रहणाने त्यांना धक्का बसला. वेळी मला वाईट वाटलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. दुःख वाटल्याने मी घरी निघून गेलो

चव्हाण म्हणाले, “कोणत्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री नको असेल? मला वाटले होते की फडणवीसच सत्तेत येतील. पण राज्यपालांकडे गेल्यावर शिंदे यांच्या नावाने सर्वांना आश्चर्य वाटले.” त्यांनी दुःख व्यक्त करत सांगितले, “मी घरी गेलो, कारण मनाला वाईट वाटले. पण नंतर फडणवीसांशी चर्चा झाली आणि साडेअकरा वाजता शिंदे यांच्यासोबत बोलायला लागलो.”, असे त्यांनी यावेळी सांगितले.

“मनातले बोलून दाखवणे चुकीचे नाही. चेहऱ्यावर दिसेल आणि मनात राहील हे बरे नाही,” असे ते म्हणाले. शिंदे यांच्याबरोबर मंत्रिमंडळात काम करताना रोष नव्हता, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा –

CJI Gavai: ‘न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज’, सरन्यायाधीश गवई यांचे मोठे विधान, प्रदीर्घ खटल्यांवर व्यक्त केली चिंता

जयंत पाटील भाजपात जाणार? प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातून १,३०० कर्मचाऱ्यांची कपात होणार