Saina Nehwal Divorce | भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांनी सात वर्षांच्या संसारानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सायनाने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली.
सायनाने घटस्फोटाबाबत माहिती देताना पोस्टमध्ये लिहिले की, “आयुष्य वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते. खूप विचारानंतर मी आणि कश्यप यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आम्ही शांतता, वृद्धी आणि आरोग्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आठवणींसाठी मी आभारी आहे आणि भविष्यासाठी शुभेच्छा देते. गोपनीयतेचा आदर करा.” या जोडप्याचा विवाह डिसेंबर 2018 मध्ये झाला होता.
सायनाचा प्रवास
सायना नेहवालने 2008 मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून नाव कमावले. 2012 मध्ये तिने ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवत इतिहास रचला होता. 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2010 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या सायनाने जगातील नंबर 1 रँकिंग मिळवणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू बनली.
तर दुसरीकडे, पारुपल्ली कश्यपने 2014 मध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकत पहिला भारतीय पुरुष शटलर म्हणून नाव कमावले. 2012 ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला असून, 2013 मध्ये त्याने जागतिक 6वी रँकिंग गाठली होती. 2024 मध्ये निवृत्तीनंतर तो प्रशिक्षक म्हणून काम करतो.