Tushar Gandhi Viral Video | बिहारमध्ये पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका (Bihar Election) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता बिहारमध्ये महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा (Tushar Gandhi) भर सभेत अपमान करण्यात आल्याची घटना घडली आहे.
महात्मा गांधींच्या कर्मभूमी बिहारमध्ये त्यांचे पणतू तुषार गांधी यांचा अपमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोतिहारीतील तुरकौलिया पंचायत भवनात झालेल्या सभेत स्थानिक प्रमुख विनय कुमार यांनी तुषार गांधींना अपमानास्पद वागणूक दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय घडलं?
तुषार गांधी ‘बदलो बिहार, नई सरकार’ अभियानांतर्गत बिहार दौऱ्यावर आहे. तुरकौलियात येथे सभा सुरू असताना त्यांनी बिहार सरकार व मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. यावेळी त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्याने महागठबंधनला मत देण्याचे आवाहन केले, ज्यावर तेथील विनय साह भडकल्याचे पाहायला मिळाले. “तुम्ही पक्षासारखे बोलताय, गांधीजींचे वंशज असू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी तुषारांना सभेतून बाहेर काढले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी की कर्मभूमि में उनके पोते तुषार गांधी का अपमान। मुखिया विनय साह ने उन्हें सभा स्थल के पंचायत भवन से अपमानजनक तरीके से बाहर निकाल दिया।#TusharGandhi #MahatmaGandhiLegacy #GandhiKarmabhoomi #BiharPolitics #PanchayatControversy #VinaySah… pic.twitter.com/V3rDrR46Yy
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) July 13, 2025
वादावेळी तुषार गांधींनी शांतपणे बोलण्याची विनंती केली, पण व्यक्तीने त्यांच्यावर टीका करत नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. “तुम्ही गांधीजींचे वंशज असूच शकत नाही” असे म्हणत त्यांनी तुषारांना अपमानित केले. स्थानिकांनी हस्तक्षेप करून समजावण्याचा प्रयत्न केला, पण तणाव वाढला आणि तुषारांना सभा सोडावी लागली.
या घटनेवर बोलताना तुषार गांधी म्हणाले, “आम्हाला चुकीची वागणूक देण्यात आली, पण आम्ही घाबरणार नाही. बिहारमध्ये बदलासाठी आमचा लढा सुरूच राहील.” ते मतदार जागरूकता आणि निवडणूक चोरीच्या विरोधात काम करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.