दिल्ली – दिल्ली विद्यापीठात (Delhi University)शिक्षण घेणारी १९ वर्षीय विद्यार्थिनी स्नेहा देबनाथचा (Sneha Debnath) मृतदेह यमुना नदीत (Yamuna River) सापडल्याने खळबळ उडाली आहे. मूळची त्रिपुराच्या (Tripura) सबरूमची रहिवासी असलेली स्नेहा दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील पर्यावरण कॉम्प्लेक्स परिसरात राहत होती.
स्नेहा ७ जुलैपासून बेपत्ता होती. पोलीस तपासात तिचे शेवटचे लोकेशन मजनू का टिला जवळील सिग्नेचर ब्रिजवर (Signature Bridge)आढळून आले होते. ७ जुलै रोजी तिला सिग्नेचर ब्रिजवर सोडले होते अशी माहिती एका टॅक्सी चालकाने दिली. काही लोकांनी सांगितले की, पुलावर एक मुलगी उभी असल्याचे पाहिले होते. त्यानंतर एनडीआरएफ आणि पोलिसांनी दिल्ली ते नोएडा दरम्यान यमुनेत शोधमोहीम सुरू केली तेव्हा गीता कॉलनी उड्डाणपुलाखाली (Geeta Colony flyover) तिचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली (identified) असून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मेहरौली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना (Delhi Police)स्नेहाच्या खोलीतून एक चिठ्ठी सापडली (finds note )असून त्यात तिने लिहिले आहे की, मी स्वतःला अपयशी समजते (I just feel like a failure and burden). मी हे सहन करू शकत नाही. मी सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करत आहे. यामध्ये कोणाचीही चूक नाही, हा माझा स्वतःचा निर्णय आहे.
स्नेहाची एक मैत्रीण सांगते की, ७ जुलै रोजी सकाळी ५:५६ वाजता स्नेहाने आपल्या आईशी शेवटचा फोनवर संवाद साधला होता. ती सराई रोहिल्ला रेल्वे स्थानकावर मैत्रीणला भेटायला जात असल्याचे सांगून निघाली होती. मात्र ती तिकडे गेली नाही. त्यानंतर तिचा फोन बंद ( switched off)झाला होता .