मुंबई– शिवधर्म फाउंडेशनचा (Shivdharma Foundation)दीपक काटे (Deepak Kate) याने काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा भाजपाचा सक्रिय पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. याबाबत भाजपा नेते (BJP)आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही. काटे कोणत्याही पक्षाचा असला तरी तो आरोपीच असल्याचे म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule)म्हणाले की, प्रवीण गायकवाड (Sambhaji Brigade’s state president Pravin Gaikwad)यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नाही. भाजपा कधीही अशा खालच्या पातळीवरच्या कृतींना प्रोत्साहन देत नाही. हे आमच्या रक्तात नाही. या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. दीपक काटे हा भाजपाचा कार्यकर्ता आहे, हे खरे आहे. पण तो कोणत्याही पक्षाचा असला, तरी कायद्याच्या दृष्टीने (legal action.)तो आरोपीच आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. कायद्यापेक्षा कोणतीही व्यक्ती किंवा पक्ष मोठा नाही.
दरम्यान, प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणाचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेतही उमटले. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar)यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले, प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीचा अपमान आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)म्हणाले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा सखोल तपास (investigated)केला जात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.