Ujjwal Nikam on Sanjay Dutt | प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नुकतीच राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेत खासदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतेच बोलताना त्यांनी त्यांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांशी संबंधित एक धक्कादायक दावा केला आहे.
अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) आधीच माहिती दिली असती तर मुंबईतील 1993 साली झालेले बॉम्बस्फोट टाळता आले असते, असा दावा त्यांनी केला आहे. NDTV ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
निकम यांनी सांगितले की, 267 लोकांचा बळी गेला होता. जर संजय दत्तने पोलिसांना शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबाबत माहिती दिली असती, तर हे स्फोट टाळता आले असते, या व्हॅनमधून त्याने एके-47 बंदूक आणि हँड ग्रेनेड घेतले होते, जे दाऊद इब्राहिमच्या हस्तक अबू सालेमने आणले होते.
निकम म्हणाले, “संजयला बंदुकांची आवड होती आणि त्याने गुन्हा केला, पण तो सरळमार्गी होता. तरीही, त्याने माहिती न दिल्याने हे विनाश टळले नाही.”
संजय दत्तला TADA अंतर्गत दहशतवादी ठरवण्यात आले नव्हते, पण शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले. त्याला शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झाली होती. निकम यांनी सांगितले की, संजयने एके-47 चालवली नव्हती, पण तिचा ताबा ठेवणे हे त्याचे चुकलेले पाऊल होते.
गुपित संभाषणाबाबत माहिती
निकम यांनी एक गुपित उघड केले की, शिक्षेच्या वेळी संजय दत्तसोबत त्यांचे संभाषण झाले होते. “संजय शिक्षा ऐकून घाबरला होता. मी त्याला म्हणालो, ‘मीडिया तुला पाहत आहे, अभिनेता म्हणून शांत राहा. जर तू शिक्षेने घाबरलेला दिसलास, तर लोक तुला दोषी मानतील. अपीलाची संधी आहे.’
कसाब आणि बिरयाणी वाद
26/11 हल्ल्याचे सरकारी वकील असलेले निकम यांनी अजमल कसाब प्रकरणातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. कसाबने तुरुंगात बिरयाणीची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला, पण त्यावर राजकीय नेत्यांनी राजकारण केल्याचे त्यांचे मत आहे. “त्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, पण तो माझा हेतू नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.