Ola Electric Maharashtra | इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता ओला इलेक्ट्रिकला (Ola Electric) महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. कंपनीने राज्यातील 450 पैकी 90 टक्के शोरूम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहने ठेवण्यासाठीच्या आवश्यक परवानग्या नसणे हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. ओला इलेक्ट्रिक देशातील सर्वात मोठ्या ईव्ही बाजारांपैकी एक आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात इलेक्ट्रिक 2-चाकी वाहनांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत फायनेंशियल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
महाराष्ट्र हे ओला इलेक्ट्रिकसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. गेल्या आर्थिक वर्षी 2,12,000 युनिट्सची विक्री करून राज्याने ईव्ही 2-चाकी सेगमेंटमध्ये आघाडी मिळवली होती. ओलाच्या एकूण 3,44,000 युनिट्सपैकी 41,000 हून अधिक युनिट्स महाराष्ट्रात विकल्या गेल्या. पण आता बहुतेक शोरूम्सकडे वैध ट्रेड सर्टिफिकेट नसल्याने कार्यक्षमतेत अडचणी निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला.
बाजारपेठेतील घसरण आणि स्पर्धा
ओलाच्या बाजारपेठेतील हिस्सा कमी होत आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत 60,500 युनिट्स विक्री करूनही हिस्सा 33.4% वरून 19.6% वर घसरला आहे. यापूर्वी विक्री आणि नोंदणीतील तफावतीमुळे नियामक तपासाला सामोरे जावे लागले होते. जूनमध्ये टीव्हीएस आणि बजाजने ओलाला मागे टाकले असून, स्पर्धा वाढल्याने कार्यप्रणाली आणि कायदेशीर आव्हानांशी सामना करणे कठीण झाले आहे.
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत ओलाचे निव्वळ नुकसान 428 कोटी रुपयांवरवर पोहोचले, जे गेल्या वर्षी 347 कोटी रुपये होते. महसूल 828 कोटी रुपयांवर आला, जो मागील वर्षी 1,644 कोटी रुपये होता.
हे देखील वाचा –