India’s cleanest city: ‘हे’ आहे देशातील सर्वात स्वच्छ शहर! सलग आठव्यांदा पटकावला मान

India's cleanest city

India’s cleanest city | केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ (Swachh Survekshan 2024-25) मध्ये इंदूरने (India’s cleanest city) पुन्हा एकदा बाजी मारत सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे. या यादीत सुरत (Surat) दुसऱ्या आणि नवी मुंबई (Navi Mumbai) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्रात ते पहिल्या स्थानावर आले आहे. गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवडचा देशात 13 वा, तर राज्यात तिसरा क्रमांक होता.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते राष्ट्रीय राजधानीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या समारंभात ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सरकारच्या माहितीनुसार, ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि शहरे व नगरे राहण्यासाठी अधिक चांगली ठिकाणे बनवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या महत्त्वाविषयी समाजातील सर्व स्तरांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे आहे.

मूल्यांकनाचे निकष आणि समाविष्ट शहरे

‘स्वच्छ सर्वेक्षण’चे हे नववे वर्ष असून, यावर्षी 4,500 हून अधिक शहरांचा समावेश केला. स्वच्छता, कचरा व्यवस्थापनआणि सेवा वितरण यांचे मूल्यांकन करण्यासाठी 10 मापदंडांचा आणि 54 निर्देशकांचा वापर केला गेला. केंद्र सरकारच्या मते, ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये “शहरी स्वच्छतेचे आणि सेवा वितरणाचे मूल्यांकन करण्यासाठी स्मार्ट, संरचित दृष्टिकोन” वापरण्यात आला.

या वर्षीच्या स्वच्छ शहरांच्या यादीत विविध लोकसंख्या श्रेणींमध्ये काही नवीन शहरे आणि महाराष्ट्रातील शहरांचाही समावेश आहे:

3 ते 10 लाख लोकसंख्या श्रेणी: नोएडा (Noida) हे सर्वात स्वच्छ शहर ठरले, त्यानंतर चंदीगड आणि म्हैसूर यांचा क्रमांक लागतो.

इतर श्रेणींमध्ये महाराष्ट्राची चमक: महाराष्ट्रातील विटा आणि पाचगणी यांचाही समावेश आहे. विटा शहर 20 हजार ते 50 हजार लोकसंख्या श्रेणीमध्ये, तर पाचगणी 20 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीतील शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहरे ठरली आहेत.

हा स्वच्छ शहराचा किताब 2016 पासून दरवर्षी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) अंतर्गत आयोजित केला जातो.

हे देखील वाचा – 

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातात पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राच्या दाव्यावर AAIB ने दिले उत्तर

विधानभवनात राडा! जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांत हाणामारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले…