Maharashtra Caste Certificate | महाराष्ट्रात आता जातीच्या (Maharashtra Caste Certificate) प्रमाणपत्रांच्या गैरवापर आणि फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतरणावर कठोर कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on SC Certificate) यांनी याबाबत विधान परिषदेत घोषणा केली आहे.
हिंदू, बौद्ध आणि शीख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचे लोक जर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र फसवणुकीने मिळवले असेल, तर ते रद्द केले जाईल. जर अशा व्यक्तींनी सरकारी नोकरी किंवा निवडणुकीचा लाभ घेतला असेल, तर त्या नोकरीतून बडतर्फी किंवा निवडणूक रद्द होऊ शकते, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
भाजप आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचना मांडताना ‘क्रिप्टो ख्रिश्चन’ लोक धार्मिक स्वातंत्र्याचा गैरवापर करत असल्याचा दावा केला. त्यांचे म्हणणं होतं की, हे लोक कागदोपत्री दुसऱ्या धर्माचे दाखवून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेतात, जे गुप्तपणे ख्रिस्ती धर्माचे पालन करतात.
यावर फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 26 नोव्हेंबर 2024 च्या निर्णयाचा हवाला देत सांगितले की, अनुसूचित जातीचे आरक्षण फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्माच्या लोकांसाठीच आहे. “अशा फसव्या प्रमाणपत्रांवर कारवाई होईल आणि आर्थिक लाभांची वसुलीही केली जाईल,” असं त्यांनी नमूद केलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील अशाप्रकारचा मुद्दा उपस्थित केला होता. आता स्पॉट व्हिजिट व तक्रारींच्या आधारे अशा प्रकरणांची सत्यता पडताळून वैधता रद्द करण्याचे अधिकार देखील अधिकार्यांना दिलेले आहेत.
हे देखील वाचा –
विधानभवनात राडा! जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांत हाणामारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले…