Maharashtra Assembly Fight | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानभवनातील हाणामारीच्या घटनेची (Maharashtra Assembly Fight) जोरदार चर्चा आहे. विधानभवनातील परिसरातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. आता या घटनेवर प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra Latest Video) उपरोधिक टीका केली आहे.
कुणाल कामराने नव्या व्हिडिओद्वारे विधानभवनातील हाणामारीच्या घटनेची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक टीका करणारे गाणे गायल्याने कुणाल कामराला टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
कुणालने आपल्या व्हिडिओत ‘हम होंगे कामयाब’ गाण्याच्या चालीवर मजेशीर शब्द लावले आहेत, ज्यामध्ये सत्ताधारी नेत्यांवर आणि त्यांच्या मित्रपक्षांवर निशाणा साधला आहे.
*Lawbreakers* pic.twitter.com/L8aiwvGlPw
— Kunal Kamra (@kunalkamra88) July 17, 2025
सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडिओत विधानसभेच्या लॉबीत नेत्यांचा गट एकमेकांशी भिडताना दिसतो, तर सुरक्षाकर्मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
व्हिडिओत “नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर,” असे शब्द देखील ऐकू येतात. “मन में नत्थू राम…” “हरकतें आसाराम, हम होंगे कंगाल एक दिन,” असे तो व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.
विधानभवनातच जुंपली
विधानभवनातील परिसरातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.