आरबीआयने महाराष्ट्रातील दोन बँकांना दंड ठोठावला

Reserve Bank of India

मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील दोन बँकांवर आर्थिक दंडाची (penalty)कारवाई केली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Thane District Central Cooperative Bank )आणि द लक्ष्मी विष्णू सहकारी बँक लिमिटेड (Laxmi Vishnu Sahakari Bank) या बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे. याशिवाय गुजरातमधील दोन बँकांना देखील दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत आरबीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली.

यात म्हटले आहे की, आरबीआयने १४ जुलैच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा बँकेला २.१० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने (Reserve Bank of India)केवायसी संदर्भात दिलेल्या निर्देशांची पूर्तता न केल्याने या बँकेवर (compliance with directions issued ) दंड आकारला. नाबार्डने ठाणे जिल्हा बँकेचे ३१ मार्च २०२४ च्या आर्थिक स्थितीचे परीक्षण केले होते. त्यामध्ये आरबीआयच्या काही निर्देशांची पूर्तता न केल्याचे उघकीस आले. त्यानंतर आरबीआयने बँकेला नोटीस पाठवली होती. त्यानुसार बँकेला त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, या बँकेने केवायसी अपडेशन संदर्भातील नियमित यंत्रणेची पूर्तता केली (deficiencies in regulatory compliance)नाही, असे आरबीआयने म्हटले. त्याच बरोबर आरबीआयने इचलकरंजीतील द लक्ष्मी विष्णू सहकारी बँकेला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या संचालक, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या कंपन्यांना देण्यात येणार्या कर्जासंदर्भातील निर्देशांची पूर्तता न केल्याने ही कारवाई करण्यात आली. आरबीआयने बँकेच्या ३१ मार्च २०२४ च्या आर्थिक स्थितीची तपासणी केली होती. मात्र, बँकेने त्यांच्या एका संचालकाला कर्ज दिले होते, असा निष्कर्ष आरबीआयने काढला आहे.