मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला कल्याणकारी शासन आपल्या दारी हा विशेष उपक्रम येत्या २० जुलै रोजी गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शनी केंद्र (नेस्को) येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा उपक्रम पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा आणि आवश्यक प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी मिळवता यावीत, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी १०वी आणि १२वीत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्याते विठ्ठल कांगणे सरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.