Home / Uncategorized / उत्तर प्रदेशात श्रावण महिन्यात मांसाहार विक्रीबंदची मागणी; ‘केएफसी’ ला लावले टाळे

उत्तर प्रदेशात श्रावण महिन्यात मांसाहार विक्रीबंदची मागणी; ‘केएफसी’ ला लावले टाळे

गाझियाबाद- श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. त्यामुळे अनेक लोक या महिन्यात मांसाहार (Nonveg) टाळतात. या पार्श्वभूमीवर उत्तर...

By: Team Navakal
KFC banned in Uttar Pradesh

गाझियाबाद- श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. त्यामुळे अनेक लोक या महिन्यात मांसाहार (Nonveg) टाळतात. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) हिंदू रक्षा दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रावणामध्ये मांसाहार विक्री बंद करण्याची मागणी करत जोरदार आंदोलन केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाजियाबादमधील एका केएफसीच्या (KFC) रेस्टॉरंटला टाळे लावले.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे.

केएफसीबरोबरच या कार्यकर्त्यांनी आणखी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन गोंधळ घातला. गाजियाबादमधील वसुंधरा येथे ही घटना घडली. हिंदू रक्षा दल नावाची संघटना गेल्या काही दिवसांपासून मांसाहार विक्री करणारी रेस्टॉरंट बंद करा अशी मागणी करत आहे. श्रावणामध्ये मांसाहार विक्री करू नये असे या संघटनेचे म्हणणे आहे.हिंदू रक्षा संघटनेचे अनेक कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन केएफसी रेस्टॉरंटच्या बाहेर जमा झाले.त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देत ते रेस्टॉरंटमध्ये घुसले.तिथे होत असलेल्या मांसाहारी पदार्थ विक्रीवर त्यांनी आक्षेप घेतला. कावड यात्रा मार्गावर येणाऱ्या सर्व मांसाहार मिळणाऱ्या रेस्टॉरंटवर बंदी घालण्याची मागणी करत त्यांनी केएफसी स्टोअर बंद केले. संघटनेचे म्हणणे आहे की,जेव्हा शिवभक्त कावड घेऊन निघतात, तेव्हा मांसाहारी खाद्यपदार्थांची होत असलेली विक्री बघून त्यांच्या भावना दुखावतात.त्यानंतर त्यांनी केएफसीचे शटर बंद केले.त्याचबरोबर श्रावण महिन्यात पुन्हा मांसाहारी पदार्थ विक्री करण्याचा प्रयत्न केला, तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशाराही दिला.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.