Parliament Canteen Menu: संसदेच्या कॅन्टीनमध्ये आता ‘हेल्दी मेन्यू’, खासदारांना मिळणार आता ‘हे’ खास पौष्टीक पदार्थ

Parliament Canteen Menu

Parliament Canteen Menu: देशाच्या संसदेतील कॅन्टीनमध्ये आता खासदार, अधिकारी आणि पाहुण्यांना आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ (Parliament Canteen Menu) मिळणार आहे. नुकतेच, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने संसद भवनात ‘हेल्दी मेन्यू’ सादर करण्यात आला आहे, ज्यात नाचणीची इडली, ज्वारीचा उपमा, मूग डाळ चिल्ला, ग्रील्ड चिकन आणि ग्रील्ड फिशसारखे पोषणमूल्य असलेले पदार्थ उपलब्ध आहेत.

अधिवेशनाच्या कालावधीत संसद सदस्यांना आरोग्यदायी पर्याय मिळावेत, यासाठी लोकसभा अध्यक्षांनी या नव्या मेन्यूची अंमलबजावणी केली आहे. पारंपरिक भारतीय आहारात वापरल्या जाणाऱ्या बाजरीसारख्या घटकांचा समावेश करत, आरोग्य आणि चव यांचा समतोल साधण्यात आला आहे.

मेन्यूतील मुख्य पदार्थ

नवीन हेल्दी मेन्यूमध्ये नाचणी इडली, ज्वारी उपमा, मिक्स मिलेट खीर, चना चाट, मूग डाळ चिल्ला, बार्ली व ज्वारी सॅलड, गार्डन फ्रेश सॅलड, ग्रील्ड चिकन आणि ग्रील्ड फिश यांचा समावेश आहे.

हर्बल टी, मसाला सत्तू आणि गुळयुक्त मँगो पन्ना अशा पेयांचा पर्यायही यात दिला आहे. प्रत्येक पदार्थासोबत त्यातील कॅलरींची माहिती देण्यात आली असून, साखर, सोडियम आणि अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स कमी ठेवण्यात आले आहेत.

सरकारचे आरोग्यविषयक उपक्रम

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये स्थूलता कमी करण्याची गरज अधोरेखित केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी अधिवेशनादरम्यान आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन सुरू केले.

या उपक्रमाला बळ देण्यासाठी फिट इंडिया चळवळ, पोषण अभियान, ईट राईट इंडिया, खेलो इंडिया आणि असंक्रामक रोग नियंत्रण कार्यक्रम राबवले जात आहेत.

हे देखील वाचा –

Ola Uber Drivers Strike: ओला-उबर चालकांचा संप तात्पुरता स्थगित, ‘OnlyMeter’ नुसार आकारणार भाडे

पाकिस्तानात पुराचे थेट प्रसारण; पत्रकार वाहून गेला

प्राध्यापकांकडून मानसिक छळ दंतवैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या