Best Indian Web Series | भारतामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, झी5, जिओसिनेमा, हॉटस्टार यांसारख्या प्लॅटफॉर्मवर हजारो ओरिजिनल वेब सिरीज (Best Indian Web Series) आणि चित्रपट दर महिन्याला प्रदर्शित होत आहेत. पण या सगळ्यांत 2025 च्या पहिल्या सहामाहीत एक शो सर्वात जास्त चर्चेत राहिला आणि तो म्हणजे ‘क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर’ (Criminal Justice Season 4).
अभिनेते पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजने पंचायत, आश्रम सारख्या वेबसीरिजला देखील मागे टाकले आहे.
2.77 कोटी प्रेक्षकांसह टॉपवर
ओरमॅक्स मीडिया यांनी नुकतीच प्रसिद्ध केलेल्या ‘टॉप 50 स्ट्रीमिंग ओरिजिनल्स इन इंडिया (2025 – पहिली सहामाही)’ यादीत ‘क्रिमिनल जस्टिस सीझन 4’ने (Criminal Justice Season 4) 2.77 कोटी प्रेक्षक मिळवत पहिले स्थान पटकावले. ही मालिका पंकज त्रिपाठी यांच्या ‘माधव मिश्रा’ या लोकप्रिय वकिलाच्या भूमिकेभोवती फिरते.
2025 मधील पहिल्या सहा महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्रिमिनल जस्टिस सीरिजची जादू पाहायला मिलाली आहे.
‘क्रिमिनल जस्टिस 4’ मध्ये दमदार कलाकारांची फौज
या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी यांच्यासोबत मोहम्मद झीशान अय्यूब, सुरवीन चावला, आशा नेगी आणि खुशबू अत्रे यांच्यासारखे कलाकार आहेत. पहिल्या तीन भागांचा प्रीमियर 29 मे 2025 रोजी झाला आणि त्यानंतर दर आठवड्याला नवे भाग प्रदर्शित झाले. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही या सीझनला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
2025 मधील भारतातील टॉप 5 सर्वाधिक पाहिले गेलेले OTT शो
- क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर (सीझन 4) – 2.77 कोटी प्रेक्षक
- एक बदनाम आश्रम (सीझन ३ृ3 – भाग 2) – 2.71 कोटी प्रेक्षक
- पंचायत (सीझन 4) – 2.38 कोटी प्रेक्षक
- पाताल लोक – 1.68 कोटी प्रेक्षक
- स्क्विड गेम (सीझन 3) – 1.65 कोटी प्रेक्षक
याशिवाय, The Legend of Hanuman, The Royals, The Secret of the Shildars, Chidiya Udd, आणि Jewel Thief ) यांसारखे शोही टॉप यादीत सामील आहेत.