Delta AirLines: भयानक! विमानाच्या इंजिनला हवेतच लागली आग, करावे लागले तातडीचे लँडिंग; पाहा व्हिडिओ

Delta Flight Engine Fire

Delta Flight Engine Fire | अहमदाबाद येथील विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता विमान सुरक्षेशी संबंधित इतर घटना समोर येत आहे. नुकतेच, डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला (Delta Flight Engine Fire) अचानक हवेत असतानाच आग लागल्याची घटना समोर आली आहे.

अटलांटासाठी निघालेल्या डेल्टा एअरलाईन्सच्या एका विमानाला लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरतातडीने लँडिंग करावे लागले. उड्डाणानंतरलगेचच विमानाच्या डाव्या इंजिनने पेट घेतला होता.

इंजिनला लागली आग

उड्डाणानंतर थोड्याच वेळात विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये बिघाडाचे संकेत मिळाले. व्हिडिओ फुटेजमध्ये आकाशातच इंजिनला आग लागल्याचे दिसत आहे. वैमानिकांनी तत्काळ आपत्कालीन स्थिती जाहीर करत, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमानाला पुन्हा LAX विमानतळाकडे वळवले.

पॅसिफिक महासागरावर थोडी चढाई केल्यानंतर, सुरक्षा तपासण्या आणि लँडिंगची तयारी करताना विमानाने डॉनी आणि पॅरामाउंटच्या दिशेने वळण घेतले. या काळात विमानाने स्थिर उंची आणि वेग राखत यशस्वी लँडिंगसाठी तयारी केली.

प्रवाशांना इजा नाही; डेल्टा आणि FAA कडून प्रतिक्रिया

सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा सदस्यांना दुखापत झाली नाही. डेल्टा एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने याची पुष्टी करत सांगितले की, “इंजिन बिघाडाचे संकेत मिळाल्यावरच वैमानिकांनी काळजीपूर्वक विमान परत आणले.”

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. हे विमान दोन जनरल इलेक्ट्रिक CF6 इंजिनवर चालते.

हे देखील वाचा –

Ola Uber Drivers Strike: ओला-उबर चालकांचा संप तात्पुरता स्थगित, ‘OnlyMeter’ नुसार आकारणार भाडे

कोल्हापुरात शक्तिपीठ समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा! घोषणाबाजी

पाकिस्तानात पुराचे थेट प्रसारण; पत्रकार वाहून गेला