Minister Manikrao Kokate found playing rummy in Assembly, Opposition criticize it ‘insult to democracy
मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate rummy controversy)यांचा विधिमंडळ सभागृहात मोबाईलवर जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट (x post)केला. त्यावर किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज अशी टीकाही केली. यानंतर कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर कोकाटे यांनी सारवासारव केली. परंतु विरोधकांनी त्यांना धारेवर धरले.
आमदार रोहित पवार(rohit pawar) यांनी व्हिडिओ पोस्ट करून लिहिले की, जंगली(rummy) रमी पे आओ ना महाराज! सत्तेतील राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. त्यामुळेच शेतीची असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करतात. तरीही काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीकविमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का? कधी शेतीवर या महाराज खेळ थांबा कर्जमाफी द्या.
काँग्रेसचे आ. विजय वड्डेटीवार (vijay waddetiwar)म्हणाले की, या खोटारड्या, धोकेबाज सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. शेतकरी मरतो आहे आणि कृषिमंत्री रमी खेळतो आहे. म्हणून माझे शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, यांना धडा शिकवा. तर उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी सरकारला सवाल केला की, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस झाला आहे. एखादा आमदार चड्डी-बनियानमध्ये फिरतो, कोणी पैशाच्या बॅगा मोजतो, कोणी कर्मचाऱ्यांना मारहाण करतो आणि आता मंत्री सभागृहात रमी खेळतात. हे लोक कोणाच्या आशीर्वादाने मंत्रिपदावर आहेत?(Rummy game in Maharashtra assembly
)
याप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik)यांनी कोकाटे यांची पाठराखण करताना म्हटले की, याबद्दल मला काही माहिती नाही. परंतु सध्या सगळेच रमी खेळतात. आमीर खान, सलमान खानही खेळतात. रमी चांगला खेळ म्हणून टीव्हीवालेही सतत दाखवतात. यावर कृषिमंत्री
या व्हिडिओवरून गदारोळ झाल्यावर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी वरच्या सभागृहात बसलो होतो, खालच्या सभागृहात काय सुरू आहे, हे यूट्यूबवर बघण्यासाठी मोबाईल घेतला. त्यादरम्यान कोणीतरी तो व्हिडिओ काढला आहे. मोबाईल सुरू केल्यावर अनेक प्रकारच्या जाहिराती येतात. त्या जाहिराती स्किप करत होतो. (viral video)व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. विरोधी पक्षातील नेते पूर्ण भाग दाखवणार नाही. ते माझे कपडे, मोबाईलवर बोलतात. परंतु माझ्या शेतकरी धोरणांवर आणि त्यांच्यासाठी केलेल्या कामांवर बोलत नाहीत. स्वतःची करमणूक आणि दुसऱ्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना जनता बळी पडणार नाही. रोहित पवारांच्या मोबाईलमध्ये अशा जाहिराती येत नाहीत का? कोणत्या गोष्टीचे भांडवल करावे आणि कोणत्या नाही, हे त्यांना समजले पाहिजे. विरोधी पक्ष मला कारण नसताना लक्ष्य करत आहे.