Saiyaara Box Office Collection: सध्या सर्वत्र सैयारा (Saiyaara Movie) या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. अगदी सोशल मीडियापासून ते बॉक्स ऑफिसपर्यंत (Saiyaara Box Office Collection) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटाने सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी दिसून येत असून, विशेषतः तरुणाईला हा चित्रपट खूप आवडत आहे. अहान पांडे (Ahan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) या जोडीची जादू चर्चेचा विषय बनली आहे.
अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले असून, संपूर्ण कलाकारांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आलिया भट्ट, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, महेश बाबू आणि करण जोहर यांसारख्या दिग्गजांनी ‘सैयारा’चे कौतुक केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील जबरदस्त कमाई केली आहे.
‘सैयारा’ची तीन दिवसात कमाई
‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सॅकनिल्क (sacnilk) च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने तीन दिवसात एकूण कमाई 83.कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ (Kabir Singh) आणि ‘आशिकी 2’ (Aashiqui 2) या चित्रपटांच्या वीकेंड कमाईला मागे टाकले आहे.
‘कबीर सिंह’ने वीकेंडला 70.83 कोटी रुपये, तर ‘आशिकी 2’ने 20.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या दोन्ही चित्रपटांपेक्षा ‘सैयारा’ खूप पुढे निघाला आहे.
‘सैयारा’चे बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
- सैयारा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1: 21 कोटी रुपये
- सैयारा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2: 25 कोटी रुपये
- सैयारा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3: 37 कोटी रुपये
- सैयारा एकूण कलेक्शन: 83.07 कोटी रुपये
‘सैयारा’ चित्रपटासोबत अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ (Tanvi The Great) आणि सोनाक्षी सिन्हा अभिनीत ‘निकिता रॉय’ (Nikita Roy) हे चित्रपटही प्रदर्शित झाले होते. मात्र, ‘सैयारा’ या दोन्ही चित्रपटांपेक्षा खूप पुढे निघाला आहे. ‘तन्वी द ग्रेट’ आणि ‘निकिता रॉय’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे कमाई करताना दिसत नाहीत.