IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 4th Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे.
सध्या 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 अशा आघाडीवर असून, त्यांनी जर हा सामना जिंकला तर मालिका त्यांच्या खिशात जाईल. पण भारताला मालिकेतील आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन करत मालिकेत विजय मिळवला होता. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता.तिसऱ्या कसोटीत विजयाच्या जवळ असूनही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
करुण नायरच्या खराब फॉर्ममुळे मधल्या फळीतील स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याशिवाय, आकाश दीप, नितीश रेड्डी आणि अर्शदीपसिंग यांची अनुपस्थिती भारतासाठी मोठं आव्हान ठरू शकते. हे खेळाडू अंतिम 11 साठी महत्त्वाचे मानले जात होते. बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार असल्याने भारतासाठी ही जमेची बाजू ठरेल.
सामना कधी आणि कुठे?
चौथा कसोटी सामना (IND vs ENG 4th Test) बुधवार, 23 जुलैपासून सुरू होईल आणि 27 जुलैपर्यंत खेळवला जाईल. सर्व दिवसांचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होतील. सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जाणार असून, भारताचा या मैदानावरचा इतिहास विशेष चांगला नाही.
सामना कुठे पाहता येईल?
हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर थेट प्रसारित केला जाईल. तसेच, जिओहॉटस्टारच्या ॲप आणि वेबसाइटवर याचे लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील उपलब्ध राहील.