Home / महाराष्ट्र / राहुल गांधींना अति डाव्या विचारसरणीने घेरले आहे ! मुख्यमंत्री फडणवीसांची टीका

राहुल गांधींना अति डाव्या विचारसरणीने घेरले आहे ! मुख्यमंत्री फडणवीसांची टीका

गडचिरोली – महाराष्ट्र सरकारच्यावतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP...

By: Team Navakal
Devendra Fadnavis on SC Certificate

गडचिरोली – महाराष्ट्र सरकारच्यावतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांना अति डाव्या विचारसरणीने घेरले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis)यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. गडचिरोली (Gadchiroli) येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’च्या विविध प्रकल्पांचे उदघाटन व पायाभरणी फडणवीसांच्या हस्ते करण्यात आली.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जन सुरक्षा विधेयक तयार करण्यात आल्यानंतर त्यातील प्रत्येक मुद्द्यावर संयुक्त चिकित्सा समितीच्या (Review Committee meetings)बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेसला (Congress)देखील या विधेयकावर कोणताही आक्षेप नव्हता. सर्वसंमतीनंतरच हे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले. पण राहुल गांधी यांनी आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांपुढे कोणताच पर्याय राहिला नाही. त्यामुळे आता या जन सुरक्षा विधेयक विरोधात आंदोलन करत आहेत.

पुढे ते म्हणाले की, गडचिरोलीत आज माओवाद्यांची नाळ तुटली आहे. आता बोटावर मोजण्याइतके लोक जंगलात आहेत. त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी बंदूक टाकून आता मुख्य धारेत यावे. गडचिरोलीला स्टील हब (steel hub)बनवण्याचे जे स्वप्न पहिले, त्याकडे आता आपण वाटचाल करत आहोत. या जिल्ह्याचे जंगल वाढवले पाहिजे. म्हणून येत्या २ वर्षात २ कोटी वृक्ष लावणार आहोत. ४० लाख वृक्ष लागवडीला आजपासून सुरवात केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या