राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

School roof collapses in Rajasthan, 7 students dead

School roof collapses in Rajasthan, 7 students dead

जयपूर – राजस्थानमधील झालावार जिल्ह्यातील (Rajasthan school roof collapse)पीपलोडी येथील सरकारी शाळेचे आज सकाळी प्रार्थना सुरु असताना छत कोसळले. या दुर्घटनेत ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर २९ विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर पोलीस व बचावपथक तातडीने घटनास्थळी पोहचले. स्थानिक ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. (Students dead in school collapse Rajasthan)त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन विद्यार्थ्यांना विशेष उपचारांसाठी अन्य रुग्णालयात पाठवले. सहा विद्यार्थ्यांना एसआरजी रुग्णालयात दाखल केले.(Jhalawar school accident)
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने पोहोचून जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले.
राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (CM Bhajanlal Sharma)यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्रातही शाळांचे ऑडीट

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (maharashtra school audit)शाळांच्या सद्यपरिस्थितीचे ऑडीट करण्याचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री (Pankaj Bhoyar)पंकज भोयर यांनी दिले.
मंत्री भोयर म्हणाले की,राजस्थानातील शाळा दुर्घटनेची स्थिती महाराष्ट्रावर येऊ नये यासाठी आज तातडीने बैठक झाली. या बैठकीत राज्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांना डागडुजीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.