जो रूट लवकरच मोडणार सचिन तेंडुलकरचा ‘हा’ मोठा विक्रम? द्रविड, कॅलिस, पॉन्टिंगला मागे टाकले,  ब्रॅडमन यांचा रेकॉर्डही मोडला

Joe Root Record:

Joe Root Record: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट (Joe Root) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा (second-highest run-getter in Test cricket) करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताविरुद्ध मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करताना त्याने ही कामगिरी केली.

ऑक्टोबर महिन्यात ॲलिस्टर कूकला मागे टाकून इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनल्यानंतर, आता त्याने आणखी तीन फलंदाजांना मागे टाकत हे स्थान पटकावले. आता तो केवळ सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) 15,921 धावांच्या विक्रमामागे आहे.

विक्रमी खेळी आणि फलंदाजांना मागे टाकले

जो रूटने भारताविरुद्ध 150 धावांची खेळी खेळत महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान मिळवला. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 7 बाद 544 धावा करत 186 धावांची आघाडी घेतली होती.

या मोठ्या आघाडीमध्ये रूटच्या उत्कृष्ट फलंदाजीचा मोठा वाटा होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे रूट सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला. रूटने राहुल द्रविड (13288) आणि जॅक कॅलिस (13289) यांना मागे टाकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा (13378) विक्रमही मोडला.

कसोटीतील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (all-time Test run-makers list):

  • सचिन तेंडुलकर (भारत) – 15,921 धावा
  • जो रूट (इंग्लंड) – 13,409 धावा
  • रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 13,378 धावा
  • जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 13,289 धावा
  • राहुल द्रविड (भारत) – 13,288 धावा

शतकांचा डोंगर आणि अन्य विक्रम

डावाच्या 96व्या षटकात रूटने या मालिकेतील आपले दुसरे आणि कसोटी कारकिर्दीतील 38वे शतक पूर्ण केले. या शतकामुळे तो शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराच्या बरोबरीने पोहोचला आहे. आता त्याच्या पुढे केवळ पॉन्टिंग (41), जॅक कॅलिस (45) आणि तेंडुलकर (51) हेच आहेत.

याच डावात रूटने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 1000 कसोटी धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला, ज्यामुळे इंग्लंडला चौथ्या कसोटीत मजबूत आघाडी घेण्यास मदत झाली. या शतकामुळे रूटने एक नवा जागतिक विक्रमही रचला आहे, त्याने ऑस्ट्रेलियाचे महान डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले.

घरच्या मैदानावर एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. आता त्याच्या नावावर भारताविरुद्ध घरच्या मैदानावर 9 कसोटी शतके आहेत. ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्ध 8 शतकांचा विक्रम केला होता, जो आता रूटने मोडला आहे.