Narendra Modi: मोदींचा दबदबा कायम! जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी, तर डोनाल्ड ट्रम्प ‘या’ क्रमांकावर

PM Narendra Modi:

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली लोकप्रियता (Most Popular World Leader) सिद्ध केली आहे. अमेरिका स्थित ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या व्यावसायिक गुप्तचर संस्थेने जाहीर जगातील सर्वात लोकप्रिय लोकशाही नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत मोदी 75 टक्के पसंतीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

जागतिक नेत्यांमध्ये मोदींचे आघाडीचे स्थान

या यादीत दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग 59 टक्के पसंतीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केवळ 44 टक्के पसंतीसह आठव्या स्थानावर आहेत. मोदींच्या बाजूने 75 टक्के मतदारांनी सकारात्मक मत दिले, तर 18 टक्के लोकांनी नकार दिला आणि 7 टक्के मतदारांनी निर्णय नोंदवला नाही.

सर्वेक्षणात नमूद केल्याप्रमाणे, या यादीत म्युंग यांचा दुसरा क्रमांक विशेष महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी नुकताच अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असूनही त्यांना मोठी पसंती मिळाली. अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई 57 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर कॅनडाचे नव्याने निवडून आलेले मार्क कार्नी 56 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज 54 टक्के पसंतीसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

भारतातील दुसऱ्या सर्वाधिक कार्यकाळाचे पंतप्रधान

मोदींनी पंतप्रधान म्हणून 4,078 दिवस पूर्ण केले असून, इंदिरा गांधी यांच्या 4,077 दिवसांच्या कार्यकाळालाही त्यांनी मागे टाकले आहे. यामुळे मोदी हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. पंडित नेहरू यांच्यानंतर इतका प्रदीर्घ कार्यकाळ कोणीही गाठलेला नाही.

ते स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत आणि बिगर-हिंदी भाषिक राज्यातून आलेले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते आहेत. शिवाय, मोदी हे पहिले बिगर-काँग्रेस नेते आहेत ज्यांनी दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण केले आहेत.