Home / देश-विदेश / मणिपूरच्या राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ

मणिपूरच्या राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ

नवी दिल्ली- मणिपूरमधील हिंसाचार (Manipur violence)थांबवण्याचे व तिथे लोकाभिमुख सरकार स्थापनेचे प्रयत्न फसल्यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा...

By: Team Navakal
President's rule in Manipur extended


नवी दिल्ली- मणिपूरमधील हिंसाचार (Manipur violence)थांबवण्याचे व तिथे लोकाभिमुख सरकार स्थापनेचे प्रयत्न फसल्यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यसभेत ही घोषणा केली.


मणिपूरच्या निसर्ग सौंदर्याला गालबोट लावणारा हिंसाचार तिथे गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. विरोधी पक्षांनी व विशेषत्वाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मणिपूरकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप केले होते. पंतप्रधान जगभर फिरत असतात, मात्र त्यांना मणिपूरच्या जनतेच्या सांत्वनासाठी जावेसे वाटत नाही असेही त्यांनी म्हटले होते. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात अपयश आल्यानंतर इथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर मणिपूरमधील हिंसाचार काहीसा कमी झाला असला तरी तो पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे तिथे पुन्हा राज्य सरकार स्थापन करण्यातही अडचण येत असल्याने केंद्र सरकारने येत्या १३ ऑगस्टपासून पुढील सहा महिन्यांसाठी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट वाढवली आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या