नवी दिल्ली – पारंपारिक कोल्हापूरी चप्पल (traditional Kolhapuri chappals)आपणच तयार केली असे म्हणून जगात लाँच करणाऱ्या प्राडा (Prada)कंपनीने आता पारंपारिक पंजाबी जुतीच्या (Punjabi jutti) उत्पादनात शिरकाव केला आहे. त्यांनी अँटिक लेदर पम्प्स (Antique Leather Pumps) या नावाने बाजारात आणलेली चप्पल पंजाबी जुती प्रमाणेच असल्याने प्राडा परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
कोल्हापूरी चपलेचे पेटंट किंवा इतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता (patent or legal permissions.) जागतिक फॅशन ब्रॅण्ड असलेल्या प्राडा या कंपनीने कोल्हापूरी चपला बाजारात आणल्या. त्यानंतर प्राडा कंपनीवर सगळीकडून टीकेची झोड (criticism) उठली होती. त्याला मुलामा म्हणून प्राडा कंपनीच्या एका शिष्टमंडळाने कोल्हापूरला भेट देऊन तेथील पांरपांरिक व्यवसायिकांशी चर्चा केली. त्यानंतर काही करार वगैरे झाल्याचे वृत्त आलेले नाही.
त्यातच प्राडाने आता पारंपारिक पंजाबी जुतीही बाजारात आणली आहे. अमृतसर, लालचंदनगर सह पंजाबमधील अनेक भागात तयार करण्यात येणारी ही जुती दर्जेदार, कलाकुसर असलेली व आरामदायी असतात. हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी रकमेत मिळणाऱ्या या जुतींची प्राडामधील किंमत भारतीय रुपयांमध्ये दीड लाख रुपये (₹1.5 lakh)आहे. यासाठी त्यांनी पंजाबच्या (Punjab)कोणत्याही कारागिरांबरोबर किंवा व्यवसायिकाबरोबर करारमदारही केलेले नाहीत. त्यामुळे प्राडा कंपनी ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भारतीय पारंपारिक व्यवसायांमध्ये अशा पद्धतीने शिरकाव करणे हे आंतरराष्ट्रीय व्यवसाय नियमांच्या विरुद्धही आहे. त्यावर आता आपले सरकार (Indian government) काही पावले उचलते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.