मुंबई – मराठी न बोलण्यामुळे मराठी भाषेचे (language)नुकसान होत आहे का? ते जर मराठीमध्ये बोलले नाही तर काय मराठीला भोक पडणार आहे का? असे वादग्रस्त विधान (controversial questions) काल मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने केले. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना छेडले असता, मला फक्त चितळ्यांची बाकरवडी माहिती (I only know Chitale’s Bakarwadi) आहे, असा उपरोधिक टोला लगावला.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला मनसे (MNS)आणि उबाठाने (UBT) विरोध केला. त्यानंतर राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले (controversy)आहे. अशातच या वादात वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेतली होती. समाज माध्यमांवर (social media)व्हिडीओ पोस्ट करत ती म्हणाली की, आपण अभिजात (Abhijat) दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे. अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मिशनरी शाळेत का शिकले? तिथे पसायदान होत नाही, ते चालते? मराठीमध्ये बोलणे किती गरजेचे आहे, याचे ज्ञान ते तुम्हाला देत आहेत. कुणी मराठी बोलले नाही तर मराठी भाषेला नुकसान होते का? भोके पडतात का? नाही पडत. या गोष्टीने कुणाच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही.
केतकीचे हे विधान समाजमाध्यमांवर चांगलेच गाजत असून, अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, मनसेने अभिनेत्रीच्या भाष्याला गांभीर्याने न घेण्याची भूमिका घेतली आहे.