नवी मुंबईत गुगल मॅपमुळे गाडी थेट खाडीत कोसळली

Google Maps caused the car to fall directly into the creek

नवी मुंबई – नवी मुंबईत गुगल मॅपच्या (Google Map) चुकीच्या मार्गदर्शनामुळे एका महिलेची चारचाकी (Car) थेट खाडीत कोसळली. ही घटना काल मध्यरात्री १ च्या सुमारास बेलापूर (Belapur) खाडीपुलाजवळ घडली. सागरी सुरक्षा पोलिसांनी (Police) वेळीच मदत करून महिलेचा जीव वाचला. ही महिला तिच्या चारचाकीने उलवे परिसरातील एका ठिकाणी जात होती. तिला रस्ते माहीत नसल्याने तिने गुगल मॅप सुरू करून दिशादर्शक सुरू केला.

यावेळी तिने बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याऐवजी पुलाखालील मार्ग निवडला. गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता असल्याचे तिला वाटले. मात्र ,तिची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवरून (Dhruvtara Jetty) खाडीत कोसळली. हा अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांना मोठा आवाज आणि पाण्याचा फवारा दिसला. त्यांनी त्वरित आपल्या बचाव पथकाला जागे केले आणि घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना महिला पाण्याच्या प्रवाहात वाहत जाताना दिसली. पोलिसांनी त्यांच्या गस्ती आणि रेस्क्यू बोटीच्या मदतीने तिचा जीव वाचवला. तिला बाहेर काढल्यानंतर तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने महिला सुरक्षित आहे.