सर्पमित्रांना 10 लाखांचा अपघात विमा! लवकरच मिळणार अधिकृत ओळखपत्र आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ दर्जा

Maharashtra Government Snake Rescuers Benefits

 Maharashtra Government Snake Rescuers Benefits | सर्पमित्रांना (Snake Rescuers) लवकरच महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) वतीने अधिकृत मान्यता आणि आर्थिक संरक्षण मिळणार आहे. ग्रामीण भागात साप पकडण्याचे धाडसी आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या सर्पमित्रांसाठी सरकारने मोठी घोषणा केी आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, सर्पमित्रांना लवकरच ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवकाचा दर्जा देण्याची शिफारस

या सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘आघाडीचे स्वयंसेवक’ म्हणून दर्जा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे. मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली. सर्पमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून साप पकडतात. अशा लोकांना शासनाची मदत आणि सन्मान मिळायला हवा, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

राज्यातील सर्व सर्पमित्रांची अधिकृत माहिती लवकरच वनविभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांना गरज पडल्यास जवळच्या सर्पमित्रांशी त्वरित संपर्क साधता येईल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात येणार आहे. यामुळे पारदर्शकतेसोबतच सर्पमित्रांच्या कार्यात सोयीसुविधा वाढतील.

सर्पमित्रांना विमा, ओळख आणि सन्मान मिळणार

या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळणार आहे. यामुळे केवळ सर्पमित्रांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाही दिलासा मिळेल. त्यांच्या योगदानामुळे मानवी आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यात मदत होणार आहे.