नरेंद्र मोदी विष्णूचे ११ वे अवतार! भाजपा नेते राज पुरोहितांचा दावा

BJP Leader Raj Purohit

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)हे विष्णूचे अकरावे अवतार आहेत. मोदी हे न थकणारे आणि न थांबणारे पंतप्रधान आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (U.S. President Donald Trump) गेल्या तीन महिन्यांपासून रोज त्यांना फोन करत आहेत, पण मोदी त्यांचा फोन घेत नाहीत असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित (BJP Leader Raj Purohit)यांनी केला आहे.

राज पुरोहित हे अॅड. उज्ज्वल निकम (Advocate Ujjwal Nikam)यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर दादरमध्ये (Dadar) त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पुरेहित बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

राज पुरोहित म्हणाले की, अमेरिकेला गेल्यावर दोन दिवस जेटलॅगमुळे आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. पण नरेंद्र मोदी फिनलंड आणि इंग्लंड दौरा करून परत अहमदाबादला येतात आणि दोन दिवसांत २२ उद्घाटने (22 projects)करतात. त्यामुळे माझा आत्मा सांगतो की, ते विष्णूचे अकरावे अवतार (Lord Vishnu.)आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना गेल्या तीन महिन्यांपासून रोज फोन करत आहेत. पण मोदी ट्रम्प यांचा फोन उचलत नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांची अवस्था वेड्यासारखी झाली. जो मोदींना नडेल तो मातीत (destroyed)मिळेल.