Madhya Pradesh Farmer Viral Income Certificate: मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यामध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका शेतकऱ्याचे (Madhya Pradesh Farmer) वार्षिक उत्पन्न (Income Certificate) केवळ 3 रुपये असल्याचे समोर आले. म्हणजेच शेतकऱ्याची महिन्याची कमाई 1 रुपये देखील नाही. मात्र, शेतकऱ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र व्हायरल (Madhya Pradesh Farmer Viral Income Certificate) झाल्यानंतर हा कागदपत्रातील त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
एका शेतकऱ्याला केवळ 3 रुपये वार्षिक उत्पन्न असलेले प्रमाणपत्र देण्यात आले . तहसीलदाराची सही आणि शिक्का असलेले हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल आहे. अनेकजण या शेतकऱ्याला “भारतातील सर्वात गरीब माणूस” म्हणू लागले आहेत. हे प्रमाणपत्र एका “लिपिकाच्या चुकीमुळे” दिले गेले होते, असे अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले.
सतना जिल्ह्यातील कोठी तहसील अंतर्गत येणाऱ्या नयागाव येथील रहिवासी रामस्वरूप (45) यांना हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. तहसीलदार सौरभ द्विवेदी यांच्या सहीने 22 जुलै रोजी जारी करण्यात आलेले हे प्रमाणपत्र व्हायरल झाल्यानंतर नेटकरी रामस्वरूप यांना “देशातील सर्वात गरीब माणूस” असे म्हणून लागले.
मोहन राज में ही मिला भारत का सबसे गरीब आदमी! सतना जिले में एक आय प्रमाण पत्र जारी हुआ! सालाना आमदनी केवल 03.00 रुपए बताई गई है!
— MP Congress (@INCMP) July 26, 2025
है ना चौंकाने वाली बात!
जनता को गरीब बनाने का मिशन?
क्योंकि, अब कुर्सी ही खा रही कमीशन! pic.twitter.com/hB8Q8fDSns
प्रमाणपत्र व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि 25 जुलैपर्यंत रामस्वरूप यांना नवीन प्रमाणपत्र जारी करण्यात आले. या नव्या प्रमाणपत्रानुसार, शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 30,000 रुपये (म्हणजे दरमहा 2,500 रुपये) दर्शवण्यात आले आहे.
“ही एक लिपिकाची चूक होती, जी दुरुस्त करण्यात आली आहे. नवीन उत्पन्नाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे,” असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
मध्य प्रदेश काँग्रेसने या चुकीचा फायदा घेत मूळ प्रमाणपत्र ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) शेअर करत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला “मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या राज्यात आम्हाला भारतातील सर्वात गरीब माणूस सापडला! वार्षिक उत्पन्न: फक्त 3 रुपये!” असा दावा पक्षाने आपल्या पोस्टमध्ये केला. उत्पन्न प्रमाणपत्राचा फोटा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.