ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde)यांनी दिल्ली दौऱ्यावरून परतताच विरोधी पक्षांना मोठा झटका दिला आहे. काल रात्री आणि आज सकाळी यवतमाळ येथील उबाठा (UBT) आणि काँग्रेस पक्षातील (Congress party)अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
एकनाथ शिंदे काल संध्याकाळी दिल्लीहून मुंबईत परतले. शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानादेखील यवतमाळमधील (Yavatmal)पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष प्रवेशासाठी ठाण्यात एक दिवस मुक्कामी राहिले होते. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
आज सकाळी नेर नगरपालिकेचे उबाठाचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, सुनीता जयस्वाल, वनिता मिसळे, नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप म्हस्के, साजिद शरिफ, नगरसेविका सरिता सुने, दर्शना इंगोले, अल्पसंख्याक आघाडीमा माजी जिल्हाध्यक्ष रिझवान खान, गणेश शीलकावार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, पंचायत समिती उपसभापती संतोष बोडेवार, माजी सभापती अभय डोंगरे, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास ठाकरे, संचालक राहुल देहणकर, उबाठाचे महागाव शहर समन्वयक अविनाश देशमुख, भाजपा पदाधिकारी तेजस ठाकरे, उबाठाचे सवनाचे पदाधिकारी रुपेश ठाकरे, अमोल जाधव, शुभम राठोड, निलेश भारती या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.