Home / महाराष्ट्र / दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टनंतर दोन गटात दगडफेक

दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टनंतर दोन गटात दगडफेक

पुणे – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात (Yavat village)आज व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टवरून (WhatsApp post.)दोन गटांत तणाव निर्माण झाला....

By: Team Navakal
Clashes In Pune Over 'Objectionable' Social Media Post;

पुणे – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात (Yavat village)आज व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टवरून (WhatsApp post.)दोन गटांत तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या जमावाने दगडफेक, दुचाकींना आग लावणे (two-wheelers on fire) आणि प्रार्थनास्थळाची तोडफोड केली. यवत पोलिसांनी (Yavat Police) अश्रुधुराच्या नळकांड्यांचा (Tear Gas As Stones) वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात (Neelkantheshwar Temple) २६ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना ताजी असतानाच एका समुदायाच्या तरुणाने व्हॉट्सॲपवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली. या पोस्टची माहिती मिळताच गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास यवतचा आठवडी बाजार (weekly market)बंद करण्यात आला. यावेळी एका गटाच्या लोकांनी काही दुचाकी पेटवून दिल्या. तर काहींनी प्रार्थनास्थळाची तोडफोड केली. या प्रकरणात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या सय्यद नावाच्या व्यक्तीसह एकाला ताब्यात घेतल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख (Narayan Deshmukh,) यांनी दिली.

Web Title:
संबंधित बातम्या