Home / महाराष्ट्र / एसटी महामंडळ राज्यभर पेट्रोल पंप सुरू करणार

एसटी महामंडळ राज्यभर पेट्रोल पंप सुरू करणार

मुंबई – एसटी (ST) महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी राज्यभरात व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल...

By: Team Navakal
ST Corporation to open petrol pumps across the state

मुंबई – एसटी (ST) महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी राज्यभरात व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्री पंप (Petrol-diesel pump) सुरू करण्यात येणार आहेत. ही महत्त्वपूर्ण माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त व्यावसायिक भागीदारीतून कार्यान्वित केला जाणार आहे.

याविषयी माहिती देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. केवळ प्रवासी तिकिटांवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. त्याच धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळ गेल्या ७० वर्षांपासून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (Indian Oil, Bharat Petroleum) यांसारख्या कंपन्यांकडून आपल्या बसेससाठी डिझेल खरेदी करते. सध्या महामंडळाकडे स्वतःच्या मालकीचे २५१ इंधन वितरण पंप आहेत, जे केवळ एसटी बसेससाठी वापरले जातात. त्यामुळे पेट्रोल पंप चालवण्याचा आणि व्यवस्थापनाचा पुरेसा अनुभव महामंडळाकडे आधीपासूनच आहे. याच अनुभवाचा फायदा घेत, आता हे पंप सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या केंद्र सरकारी कंपन्यांशी व्यावसायिक करार करून ही योजना राबवण्यात येणार आहे. या पंपांवर इंधन विक्रीबरोबरच किरकोळ विक्रीसाठी रिटेल शॉपही उभारले जातील. यामुळे फक्त महामंडळाचे उत्पन्न वाढणार नाही, तर इतर संबंधित व्यवसायांनाही चालना मिळेल.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या