थकलेल्या देयकांसाठी कंत्राटदारांची राज्यस्तरीय बैठक

Maharashtra State Contractors’ Association

मुंबई – राज्य सरकारच्या विविध विभागांतील विकास कामे करणाऱ्या लाखो कंत्राटदारांची सुमारे ८९ हजार कोटींची बिले (₹89,000 crore pending bills) सरकारने थकवली आहेत.सरकार (Maharashtra government)ही बिले अदा करण्यासाठी केवळ आश्वासने देत आहे. त्यामुळे आता ही बिल रक्कम मिळविण्यासाठी उद्या रविवार ३ ऑगस्ट रोजी पुढील दिशा ठरवली जाणार आहे. यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका आयोजित केल्या आहेत,अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे (Maharashtra State Contractors’ Association)अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली.

मिलिंद भोसले (Association president Milind Bhosale,)यांनी सांगितले की,राज्यातील सर्वच ३५ जिल्ह्यांमध्ये संघटनांच्या माध्यमातून उद्या रविवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत बैठका आयोजित केल्या आहेत.या बैठकीत आपापल्या जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन (public works, rural development, Jal Jeevan Mission)व इतर अनेक विभागातील प्रलंबित देयके व इतर अनेक प्रश्न,समस्या, या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शासनाविरोधात मोठा निर्णय राज्य संघटनेकडून घेतला जाणार आहे.दहा दिवसांपूर्वी सांगलीतील तरुण कंत्राटदार अभियंता हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली होती.अर्जिमितीला दहा दिवस झाले.मात्र शासन या विषयावर व कंत्राटदारांची थकित बिले देण्याबाबत हतबल दिसत आहे.