JSW Cement मध्ये गुंतवणुकीची संधी, येतोय कंपनीचा IPO; शेअर्सची किंमत खूपच कमी

JSW Cement IPO Details In Marathi

JSW Cement IPO Details In Marathi: जेएसडब्ल्यू ग्रुपचा (JSW Group) भाग असलेल्या जेएसडब्ल्यू सिमेंटने (JSW Cement) आपल्या आगामी IPO साठीची किंमत निश्चित केली आहे. कंपनीचा आयपीओ 7 ऑगस्ट 2025 रोजी खुला होणार आहे. कंपनी या आयपीओद्वारे 3,600 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.

या सार्वजनिक इश्युमध्ये 1,600 कोटी रुपयांचे 10.88 कोटी नवीन शेअर्स आणि 2,000 कोटी रुपयांचे 13.61 कोटी शेअर्सची विक्री (Offer for Sale) यांचा समावेश आहे. कंपनीने सुरुवातीला 4,000 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, पण नंतर इश्युचा आकार कमी करण्यात आला.

JSW Cement IPO बद्दल महत्त्वाची माहिती (JSW Cement IPO Details In Marathi)

  • किंमत: प्रति शेअर 139 ते 147 रुपये.
  • अर्ज करण्याची तारीख: 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025.
  • किमान गुंतवणूक: एका किरकोळ गुंतवणूकदाराला (Retail Investor) किमान 102 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी किमान 14,178 रुपये लागतील.
  • लिस्टिंग: जेएसडब्ल्यू सिमेंटचे शेअर्स 14 ऑगस्ट 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीची पार्श्वभूमी

2006 मध्ये स्थापन झालेल्या जेएसडब्ल्यू सिमेंटला ‘ग्रीन सिमेंट तयार करण्यासाठी ओळखली जाते. कंपनीचे अनेक प्रकल्प देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये आहेत.

या कंपनीचे प्रवर्तक सज्जन जिंदाल, पार्थ जिंदाल, संगीता जिंदाल, आदर्श ॲडव्हायझरी सर्व्हिसेस आणि सज्जन जिंदाल फॅमिली ट्रस्ट आहेत. जेएसडब्ल्यू सिमेंट देशभरात एकूण 7 उत्पादन युनिट्स चालवते. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमधील प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही देखील JSW Cement मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.