Home / देश-विदेश / मुस्लिम मुख्याध्यापक नको! शाळेतील टाकीत विष टाकले; श्रीराम सेनेचा तालुकाध्यक्ष अटकेत

मुस्लिम मुख्याध्यापक नको! शाळेतील टाकीत विष टाकले; श्रीराम सेनेचा तालुकाध्यक्ष अटकेत

बंगळुरू- मुस्लिम मुख्याध्यापकाला (Muslim principal) हटवण्यासाठी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी रसायन टाकल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील (Karnataka) बेळगाव (Belgaon) जिल्ह्यात घडला...

By: Team Navakal
Poison was poured into the school tank
Social + WhatsApp CTA

बंगळुरू- मुस्लिम मुख्याध्यापकाला (Muslim principal) हटवण्यासाठी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी रसायन टाकल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील (Karnataka) बेळगाव (Belgaon) जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी श्रीराम सेनेचा (Sriram Sena) तालुका अध्यक्ष सागर पाटील (Sagar Patil) याच्यासह नागनगौडा पाटील (Naganagouda Patil) व कृष्णा मदार (Krishna Madar) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

गेल्या १३ वर्षांपासून हुलीकट्टी परिसरातील सरकारी शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सुलेमान गोरीनाईक यांच्यावरील वैयक्तिक रागातून आणि त्यांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने शाळेतील पाण्याच्या टाकीत विषारी द्रव्य मिसण्याचा भयंकर प्रकार करण्यात आला. त्यामुळे १२ विद्यार्थी आजारी पडले , त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेने शाळा प्रशासन आणि पालकवर्गात भीती व चिंता पसरली आहे. हे कृत्य करण्यासाठी आरोपींनी एका पाचवीच्या विद्यार्थ्याचा वापर केल्याची बाब उघड झाली आहे. पोलीस (Police) चौकशीत या विद्यार्थ्याने सांगितले की, कृष्णा मदार याने त्याला हे विषारी द्रव्य टाकायला सांगितले होते. सागर पाटील व नागनगौडा पाटील या दोघांनी कृष्णा मदारला आंतरजातीय प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देऊन हे कृत्य करण्यास प्रवृत्त केले. त्यांना शाळेत मुस्लीम मुख्याद्यापक नको होता. सागरने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या