Home / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंचे निवडणुक तयारीचे आदेश! मनसे युती पक्ष ठरवणार

उद्धव ठाकरेंचे निवडणुक तयारीचे आदेश! मनसे युती पक्ष ठरवणार

मुंबई – शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक तयारीचे आदेश दिले....

By: Team Navakal
Uddhav Thackeray

मुंबई – शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक तयारीचे आदेश दिले. मुंबई (Mumbai) व आसपासच्या भागातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी मनसे (MNS) युतीचा (Alliance)निर्णय पक्ष घेणार असल्याचे निर्देशीत केले.


उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यासोबत ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर , भिवंडी, वसई विरार या ७ महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आदेश दिले की, जेथे गटप्रमुखांच्या नेमणुका झालेल्या नाही तेथे गटप्रमुखांच्या नेमणुका करा, महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक तयारी करा, न्यायालयाच्या निर्णयानुसार नवीन प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत, त्यावर विशेष लक्ष ठेवा, ज्या गोष्टी घडत आहेत त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा.

Web Title:
संबंधित बातम्या