रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानावर कधी परतणार? जाणून घ्या टीम इंडियाचे पुढील वेळापत्रक

Indian Cricket Team Upcoming Matches

Indian Cricket Team Upcoming Matches: इंग्लंड आणि भारत यांच्यातील रोमांचक कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. शेवटच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले. आता भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) वर्षाच्या उर्वरित आव्हानांसाठी सज्ज झाला आहे.

या वर्षात संघाला काही महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. यामध्ये बहुराष्ट्रीय स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिकांचा समावेश आहे. यासोबतच, क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मैदानावर एकत्र खेळताना पाहता येणार आहे. चला तर, संघाच्या आगामी वेळापत्रकावर (Schedule) एक नजर टाकूया.

आशिया कप

सप्टेंबर महिन्यात आशिया कप (Asia Cup) खेळला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरला होईल आणि अंतिम सामना 28 सप्टेंबरला होईल. ही स्पर्धा टी-20 फॉर्मेटमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान महामुकाबला देखील चाहत्यांना पाहायला मिळेल.

वेस्ट इंडिजचा भारत दौरा

आशिया कपनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळतील.

  • पहिली कसोटी: 2 ऑक्टोबर, 2025
  • दुसरी कसोटी: 10 ऑक्टोबर, 2025

ऑस्ट्रेलियाचा दौरा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 एकदिवसीय (ODI) आणि 5 टी-20 (T20) सामन्यांची मालिका खेळली जाईल. याच दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा निळ्या रंगाच्या जर्सीत दिसतील. दोन्ही खेळाडूंनी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते पहिल्यांदाच मैदानात उतरतील.

  • एकदिवसीय सामने: 19, 23 आणि 25 ऑक्टोबर
  • टी-20 सामने: 29, 31 ऑक्टोबर, 2, 6 आणि 8 नोव्हेंबर

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचा भारत दौरा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचे (India vs South Africa) यजमानपद भूषवेल. या दौऱ्यात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले जातील. त्यानंतर जानेवारीमध्ये न्यूझीलंडचा संघ (India vs New Zealand) भारताच्या दौऱ्यावर येणार असून, दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल.