लातूर -महाराष्ट्रातील आजचे विरोधक (opposition) हवेत बाण सोडतात, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लातूर जिल्हा परिषद प्रांगणात (Latur Zilla Parishad)लोकनेते गोपीनाथ मुंडे (late leader Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले (Shivendra Singh Raje Bhosale), आमदार पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde)आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)म्हणाले की, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh.)यांची मैत्री (friendship) सर्वांना माहीत आहे. आज त्यांच्या पुतळ्यांची उभारणी एकमेकांच्या शेजारी झाली आहे, हे विशेष आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition s)कसे असावेत याचे गोपीनाथ मुंडे हे उदाहरण होते. त्यांनी कधीही आरोप मागे घेतले नाहीत. उलट समोरच्याचा राजीनामा (resignation)घेऊनच थांबले. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना गोपीनाथ मुंडे झोपेतही दिसायचे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध मुंडेंनी अनेक विषय मांडले. अलीकडे लोक हवेत बार सोडतात. दुसऱ्या दिवशी वेगळेच बोलतात. दाऊदच्या बोलबाल्याच्या काळातही त्यांनी नाव घेऊन सत्ताधाऱ्यांना ठणकावले आणि राज्यात एक वातावरण निर्माण केले.
यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde)म्हणाल्या की, स्वाभिमान कधीही गहाण ठेवायचा नाही, तुकडे स्वीकारायचे नाहीत, असे बाबांनी मला शिकवले. जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केले. आयुष्यात काय करायचे हे त्यांनी शिकवले नाही, पण काय करू नये हे शिकवले. बेरजेचे राजकारण (politics) हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि तेच मुख्यमंत्री फडणवीस पुढे नेत (carrying that legacy) आहेत.