मुंबई – आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाच्या (IDBI Bank privatization)विरोधात आज बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी एकदिवसीय देशव्यापी संप (one-day nationwide strike)केला. या संपात वरिष्ठ कार्यपालक वगळता कंत्राटी कर्मचारी, नियमित कर्मचारी आणि अधिकारी सर्वांनी सहभाग घेतला. मुंबईतील बँकेच्या मुख्यालयासमोर (headquarters) निदर्शनेही करण्यात आली.
सध्या आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक (public sector bank) म्हणून ओळखली जाणारी आयडीबीआय खाजसगी क्षेत्रात गेल्यास, सामान्य ठेवीदारांचे हित धोक्यात येईल, असे संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी सरकारला बँकेचा मालकी हक्क खासगी तसेच विदेशी भांडवलदारांकडे (private or foreign investors)न देण्याचे आवाहन संपकरी कर्मचाऱ्यांनी सरकारला केले.
युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआयचे देवीदास तुळजापूरकर (Devidas Tuljapurkar) म्हणाले की, आयडीबीआयचे खाजगीकरण हा आंतरराष्ट्रीय वित्तभांडवलाचा (international finance capital) भारतीय बँकिंगवर हल्ला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतरही भारतीय बँकांच्या बाबतीत तोच प्रयोग होईल. ज्यामुळे भारतीय बँकिंगचे अस्तित्व आणि सार्वभौमत्व धोक्यात येईल. सरकारने फेरविचार केला नाही तर सर्व संघटनांना (unions) सहभागी करून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.