New Chapter of Confusion in Mahayuti Over Raigad Guardian Minister Post! Gogawale Stands Firm
मुंबई – देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis)मुख्यमंत्रीमंत्रीपदाचे(CM) नऊ महिने सरून वर्षपूर्ती व्हायची वेळ आली, तरी महायुतीतला(Mahayuti internal conflict) पालकमंत्रीपदाचा(Guardian Minister)संघर्ष काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आगामी स्वातंत्र्यदिनी जिल्हा स्तरावर झेंडावंदन करण्यासाठी राज्य सरकारने मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. रायगड (Raigad)आणि नाशिकच्या(Nashik)पालकमंत्रीपदावरून संघर्ष सुरू असतानाच फडणवीस सरकारने प्रसिद्ध केलेल्या या यादीवरून महायुतीतल्या नाराजीला नव्याने तोंड फोडून दिले आहे.
१५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्याच्या शासकीय झेंडावंदनासाठी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (aditi tatkare)यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि त्यांचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale)यांच्यावर केलेली कुरघोडी असल्याचे म्हटले जात आहे. रायगडच्या राजकारणात ज्येष्ठ असलेले गोगावले हे पालकमंत्रीपदासाठी सुरुवातीपासूनच आग्रही आहेत. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवख्या असलेल्या अदिती तटकरेच सरस ठरल्या. या सर्व संघर्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे आणि गोगावले यांच्यातल्या पारंपरिक वादाची किनार आहे. यात आतापर्यंत तटकरे यांनीच बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.
गेल्या २६ जानेवारीलाही प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाचा मान मंत्री तटकरेंनाच मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातून भाजपइतकेच तीन आमदार विधानसभेवर असूनही एक आमदार असलेली राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेवर वरचढ ठरत आहे. या सगळ्यांना महायुतीतल्या अंतर्गत संघर्षाची किनार असल्याचं म्हटले जात आहे.
दुसरीकडे, मंत्री गोगावले मात्र पालकमंत्रीपदावर ठाम आहेत. सध्या दिल्लीत असलेले गोगावले म्हणाले, मी आजही पालकमंत्रीपदावर १०० टक्के ठाम आहे. रायगडचा पालकमंत्री व्हावे ही माझी इच्छा आहे. झेंडावंदन करणे आणि पालकमंत्रिपद यामध्ये फरक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडसोबतच शिवसेनेने पालकमंत्रीपदासाठी दावा केलेल्या नाशिक येथील झेंडावंदनासाठीही भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना मान दिला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे शिक्षणमंत्री दादा भुसे हेही पालकमंत्रीपदासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री जाहीर केल्यानंतरही फडणवीस सरकारने दोन्ही नावांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर स्थगिती दिली होती. आता मात्र जिल्ह्यांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय हे तटकरे आणि महाजन यांच्याच उपस्थितीत होत असल्याने शिंदे गटाचा दावा कमकुवत होत आहे.
सध्या दिल्लीत असलेले गोगावले म्हणाले, ‘मी आजही पालकमंत्रीपदावर १०० टक्के ठाम आहे. रायगडचा पालकमंत्री व्हावे ही माझी इच्छा आहे. झेंडावंदन करणे आणि पालकमंत्रिपद यामध्ये फरक आहे.सध्या दिल्लीत असलेले गोगावले म्हणाले, मी आजही पालकमंत्रीपदावर १०० टक्के ठाम आहे. रायगडचा पालकमंत्री व्हावे ही माझी इच्छा आहे. झेंडावंदन करणे आणि पालकमंत्रिपद यामध्ये फरक आहे. त्यामुळे यावर वरिष्ठ निर्णय घेतील, तो मला मान्य आहे.’
गोगावलेंनी पालकमंत्रीपदाची इच्छा उघडपणे बोलून दाखवली असली, तरी भुसेंनी मात्र झेंडावंदनाचा मान महाजनांना मिळाल्यामुळे आपण नाराज नसल्याचे पत्रकारांना सांगितले. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुसे इच्छूक असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना संधी मिळाल्याने दावेदारांमध्ये वाढ झाली आहे.