Tariffs on India Hurt Russia: Trump Ahead of Putin Meeting Claims
वॉशिंग्टन – भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्याने रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे, (Trump tariff India Russian oil impact)असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन येथे केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीआधी ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी अलास्का शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्राध्यक्षांची ही भेट होणार आहे. युक्रेन-रशिया(ukrain- rassia) युद्धावर तोडगा काढण्यासाठी या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.(Putin meeting Alaska tariffs claim)
भारतानेही या शिखर परिषदेचे स्वागत केले आहे. तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धावर शांततामय तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे टॅरिफबद्दल हे विधान समोर आले आहे.
व्हाईट हाऊस(white house) येथील पत्रकार परिषदेत भारताचे नाव न घेता ट्रम्प म्हणाले, रशियाची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत झाली असून टॅरिफ वाढीच्या निर्णयामुळे त्याला आणखी खीळ बसेल. रशियाचा सर्वात मोठा आणि दुसऱ्या क्रमांकाचा तेल खरेदीदार देशाला फटका बसला आहे. अमेरिकेने अनेक देशावंर कर लादल्यामुळे जागतिक दबाव निर्माण झाला असून त्याचे परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहेत.
काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख ‘मृत अर्थव्यवस्था’ असा केला होता. दरम्यान, युक्रेनविरोधातील युद्ध तात्काळ थांबवावे, यासाठी ट्रम्प यांनी रशियाला अनेकवेळा इशारा दिला. त्यानंतरही दोन्ही देशांतला संघर्ष सुरूच आहे. आता ट्रम्प यांनी थेट रशियावरच आर्थिक निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अलास्का शिखर परिषदेत ट्रम्प-पुतिन भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीतून युद्ध समाप्त झाल्यास त्याचा सध्या ताणणेल्या भारत-अमेरिका संबंधांवरही सकारात्मक परिणाम होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आपणच थांबवल्याचा दावा ट्रम्प यांंनी जवळपास ४० वेळा केला आहे. आर्थिक नाकेबंदी करून आपण जगभरात शांतता प्रस्थापित करत असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आपण शांततेच्या नोबेल पुरस्काराचेही प्रबळ दावेदार असल्याचे ट्रम्प बोलून दाखवतात. पण त्यांच्या या दाव्यावरून ते जगाच्या राजकारणात एक विनोदी पात्र ठरले आहेत. मात्र, रशिया-युक्रेन युद्धावर पडदा पडल्यास ही एक मोठी उपलब्धी म्हणून बघितले जाईल.