Home / News / कांद्याच्या माळा घालून संसदेत मविआ खासदारांचे आंदोलन

कांद्याच्या माळा घालून संसदेत मविआ खासदारांचे आंदोलन

MVA MPs Protest in Parliament Wearing Onion Garlands

MVA MPs Protest in Parliament Wearing Onion Garlands

नवी दिल्ली – महाविकास आघाडीच्या (MVA MP)खासदारांनी आज संसद परिसरात कांद्याच्या प्रश्नावर (Onion price protest Parliament)आंदोलन केले. खासदारांनी हातात कांद्याच्या माळा घेऊन संसद भवनात प्रवेश करीत सरकारचे लक्ष वेधले. केंद्र सरकारचे कांदा निर्यातीबाबतचे धोरण हे कांद्याच्या सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.(Rising onion prices India)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने योग्य पावले उचलावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. कांद्याला हमीभाव मिळावा. नाफेडमध्ये भ्रष्टाचार सुरु आहे त्याची चौकशी करण्यात यावी. कांद्याच्या दराबाबत आणि निर्यातीबाबतच्या धोरणांवर तातडीने विचार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.(MSP for onion farmer)

खासदार निलेश लंके म्हणाले की, राज्यात कांद्याचे उत्पादन सर्वात जास्त होते, पण कांद्याला भाव मिळत नाही. १२ रुपयाला कांदा विकावा लागत असेल तर शेतकरी काय करणार? यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कांद्याला ४५ रुपये भाव मिळावा अशी आमची मागणी आहे.